Patient Education post - 4
नमस्कार मंडळी 😊
यावेळी मी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला आहे.
हो. हा blog मी मराठीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि विषयही तेवढाच महत्त्वाचा,डोळे उघडणारा आहे.
आजकाल खुप लोक तंबाखू च सेवन करतात.काही काळानंतर त्यांना त्याची सवयही होते.या सवयीमुळे तोंडात किंवा संपूर्ण शरीरात बरेच बदल घडून येतात.याच नक्की कारण काय आणि यातून मार्ग कसा काढायचा याबद्दल स्वतः तंबाखू काय म्हणू इच्छिते हे पाहूया.
मी तंबाखू बोलतेय!
डॉक्टरांनी वर सांगितलेल्या माहितीनुसार व शिर्षकावरून तुम्हाला अंदाज आला असेलच की आज आपण ‘माझ्याविषयी’ बोलणार आहोत.चला तर मग मी माझी ओळख करून देते.
सर्वात आधी,फ्रान्स मधल्या JEAN NICOTE या व्यक्तिने सन १५६० मध्ये माझी ओळख जगाला करून दिली.सुरुवातीला माझा उपयोग बऱ्याच चांगल्या कामासाठी होत होता.जसे की,जखमांवर उपचारासाठी किंवा वेदना कमी होण्याकरिता वापरले जायचे.
काही वर्षांनंतर,वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार असे समजले की माझ्या वापरामुळे अनेक घातक दुष्परिणाम होत आहेत.
मी एवढी वाईट कशी ?
- माझे अस्तित्व माझ्यात असलेल्या द्रव्यरूपी हृदयामुळे,म्हणजेच निकोटिन मुळे आहे.निकोटिन किटकनाशक हि आहे.माझ्या रोपट्यातील किमान ६४% निकोटिन हे पानांमध्ये साठवले जाते.
- माझ्या सेवनानंतर,निकोटिन वेगाने रक्तप्रवाहात मिसळू शकते.निकोटिन त्वचेतून तर शरिरात चटकन शिरतेच पण,धूम्रपानातील धुरांमार्फत ते श्र्वसनमार्गात सोडले की लगेच रक्तात मिसळते.निकोटिन रक्तात मिसळल्यापासुन १०-२० सेकंदात संपूर्ण शरीरात पसरते आणि मेंदूपर्यंत पोहचून नशा चढल्याचा अनुभव देते.त्यामुळे आपल्या मनात मानसिक व शारीरिक स्वास्थ्याची तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते.
- निकोटिनचा हा परिणाम काही काळाने शुध्द रक्त पुरवठ्याने कमी होतो.हिच भावना परत मिळविण्याच्या हेतूने माझं पुन्हा सेवन केले जाते.यामुळे काही काळात माझे व्यसन लागते.
मी तुमच्यासाठी कशी घातक आहे ?
माझ्यामुळे तुमच्या शरीरात मुख्यतः तोंडात बरेच बदल घडून येतात.जसे की,
1.दातांचा रंग बदलणे.
2.दातांची झीज होणे.
3.दातांना किड लागणे.
4.हिरड्यांचे आजार होणे.
5.दाताच्या सभोवतालच्या हाडाची झीज होऊन दात हालू लागणे.
6.तोंडाला वास येणे.
7.तोंडामध्ये काळे/पांढरे चट्टे पडणे.
8.तिखट व गरम अन्नपदार्थ खाल्यावर आगआग होणे.
9.तोंड कमी उघडणे.
10.जबड्याचा,जीभेचा व तोंडातल्या इतर भागांचा कॅन्सर होणे.
माझ्यामुळे होणाऱ्या कर्करोगाच्या 'शक्यता' दाखवणारी लक्षणे:
1.तोंडामध्ये कुठेही (जीभ,गाल,ओठ,टाळू,घसा)पांढरे चट्टे दिसणे.
2.तोंडामध्ये फोड येणे.
3.हिरड्यामधुन रक्त किंवा पू येणे.
4.दात अचानक हालू लागणे.
5.कुठलीही जखम भरण्यास वेळ लागणे.
6.तोंडामध्ये बऱ्याच दिवसांपासून असलेली सूज किंवा गाठ.
7.कुठल्याही भागात अचानक आलेले बधिरपणा.
मला निरोप कसा द्याल ?
मला निरोप देणं तस थोड अवघडच आहे म्हणा, पण तरी अशक्य नाही. माझ्या वापरामुळे फक्त तुम्हालाच नव्हे तर तुमच्या सभोवताली असणाऱ्या कुटुंबियांना व मित्रपरिवाराला घातक दुष्परिणमांना तोंड द्यावे लागते. माझ्या दीर्घकाळ वापरामुळे सरासरी १५ वर्ष आयुष्य कमी होते आणि दिवसा अंदाजे २५०० लोक मृत्यूला तोंड देतात.
• मला निरोप देण्यासाठी रोजच्या जीवनात काही बदल करा जसे की,
1.सुरुवातीला,तुमच्या नावडत्या सिगारेट चे ब्रँड विकत घ्या.
2.सिगारेट किंवा मला खाण्याची नेहमीची वेळ बदला.
3.सिगारेटच्या पाकिटावर रबर गुंडाळून ठेवा..जेणे करून काढताना विचार कराल.
4.नेहमीच्या हातात सिगारेट न पकडता दुसऱ्या हातात पकडा.
5.दारू किंवा वेगळी ड्रिंक्स घेणे टाळा.या गोष्टी सिगारेट व माझे सेवन करण्यासाठी आवड निर्माण करतात.
6.रोज सकाळी उठून व्यायाम,मेडिटेशन करणे.
7.रोजच्या रुटीनमध्ये काही सकारात्मक बदल करा जसे की चांगली पुस्तक वाचणे.. कॉमेडी फिल्म्स पाहणे..जवळच्या व्यक्तींना फोन करून बोलणे…त्यांना भेटणे.
8.झोपताना लवकर झोपा आणि झोपायची एकंदरित वेळ वाढवा.
9.चहा किंवा कॉफी चा प्रमाण कमी करा ज्याच सेवन सतत तुम्हाला सिगारेट किंवा तंबाखू ची आठवण करून देईल.
10.भरपूर प्रमाणात थंड पाणी प्या..लस्सी किंवा ज्यूसेस प्या.
11.दिवसातून कमीतकमी एकदा मेडीटेशन (दीर्घ श्वास घेत एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे) करत जा...ज्याने तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि टेन्शन कमी होईल.
12.जेवणाची वेळ चुकवू नका.जेवणात योग्य प्रमाणात फळे व पालेभाज्या खा.
• माझे सेवन बंद करण्यास मदत करणारी काही औषधी (medicinal) पद्धती:
तुम्ही स्वतः करत असलेल्या प्रयत्नांना जोड म्हणून या काही मेडिसिनल पद्धती नक्कीच यशस्वीरित्या तुमचा माझ्यासाठी असलेला व्यसन बंद करण्यास मदत करतील.
1.निकोटिन रीप्लेसमेंट थेरेपी( NRT):
NRT मुळे माझ सेवन बंद केल्यावर दिसणारी लक्षणे कमी होतात व माझ व्यसन पूर्णपणे बंद करण्यास मदत होते.NRT मध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे जास्त दुष्परिणाम होत नाहीत आणि त्यांचे व्यसन ही लागत नाही.NRT मध्ये खालील काही गोष्टींचा समावेश होतो.
• चघलायच्या गोळ्या ( Chewing gums ):
या गोळ्या दिवसातून कमीतकमी १०-१५ वेळा खाऊ शकतो.निकोटिन च्या गोळ्या वापरण्यासाठी एक विशिष्ठ पद्धत आहे.निकोटिनच्या गोळ्या तोंडात आगआग होईपर्यंत किंवा हिरड्याना टोचल्यासारखी भावना येईपर्यंत चघळा.त्यानंतर ती गोळी हिरड्या व गालाच्या मध्ये ठेवा, जोपर्यंत टोचाण्याची भावना कमी होत नाही.त्यानंतर पुन्हा ३० मिनिटे तीच गोळी चघळा आणि हीच कृती पुन्हा करा.या गोळ्या चघळण्याआधी १५ मिनिटे व चघलेपर्यंत काही खाऊ पिऊ नका.
• पॅचेस ( Nicotine Patches ):
निकोटिनच्या पॅचेस त्वचेवर लावल्यानंतर,निकोटिनटीचा स्त्राव शारितात सतत होत असते.निकोटिन शरीरातून चटकन शोषले जाते व पूर्ण शरीरभर पसरते.या पॅचेस वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असतात.या पॅचेसचा वापर न चुकता रोज होणे आवश्यक आहे आणि रोज सकाळी त्या पॅचेस बदलावे.अशा प्रकारे कमीतकमी ८-१२ आठवडे वापरावे.
2. औषधे ( Pills ):
काही निकोटिन-विरहित गोळ्या मला सोडण्यासाठी व सोडल्यावर दिसणारी लक्षणे कमी करण्यासाठी मदत करतात.यासाठी डॉक्टरांना भेटा व लवकरच उपचार सुरू करा.
3. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला:
डॉक्टरांचा योग्य सल्ला व समुपदेशन (counselling) तुमच्या वागण्यात नक्कीच बदल घडवून आणेल.खालील काही गोष्टींबाबत जास्त माहिती देऊन तुम्हाला योग्य मदत करतील.
१.मला बंद केल्यावर दिसणाऱ्या लक्षणांबाबत माहिती देणे किंवा त्यांना कशा पद्धतीने तोंड द्यावे याबद्दल मार्गदर्शन करणे.
२.तुमच्याशी व्यक्तिगत स्तरावर संवाद साधून तुमच्या समस्या समजून
घेणे आणि त्याबद्दल मार्गदर्शन करून काही उपाय सांगणे.
घेणे आणि त्याबद्दल मार्गदर्शन करून काही उपाय सांगणे.
३.कुठल्या गोष्टींमुळे/प्रतिक्रियेमुळे पुन्हा माझे किंवा सिगारेट चे व्यसन लागू शकते याबद्दल माहिती देऊन समजावणे.
४.Stress management म्हणजेच कुठलीही काळजी असेल किंवा टेन्शन असतील तर त्यांना कसं हॅण्डल करावं आणि ते कसं कमी करून व्यसनमुक्त राहू शकतो हे पटवून देणे.
“आयुष्य संपवण्यापेक्षा…तंबाखूचे व्यसन संपवणे कधीही चांगलं”..!!
धन्यवाद.
13 comments:
Very nice
Thank you 😊
Great...
Khup chan mahiti dili..thank you
Thank you 😊
very usefull information
About tobacco use and it's necessity to quit use of tobacco is very brilliantly explained and written
Thank you 😊
Thank you so much 😊
Chan aahe mahiti
Thank you 😊
You have done great job on this article. After reading this post I am going to make this post as a bookmark. I was really appreciate the value you provide on this blog. It was really dammm too amazing article. Thanks for sharing that kind of stuff with us. It really means a lot to me. dentist coronation ab
@castordental thank you so much for such a kind words.
Post a Comment